आपले जीवन जगत असताना आपल्याला काही कामे मधूनच सोडून द्यायला नाही पाहिजे, आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणते आहेत हे कामे.

घेतलेले कर्ज किंवा उधार:-कर्ज घेणे किंवा उदार घेणे हे खुपच साधारण गोष्ट होऊन गेले आहे. आपण ज्या व्यक्तीकडून कर्ज अथवा उधार घेतले आहे त्याला परत द्यायला हवे. अनेक लोक घेतलेले कर्ज किंवा उधारी परत देत नाही किंवा बुडवत असतात.

घेतलेले कर्ज किंवा उधार मागे देऊ शकले नाही तर यामुळे नातेसंबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीने आपला व्यवहार हा सुरळीत ठेवायला हवा. त्यामुळे तुम्ही जर कुणाकडून उधार किंवा कर्ज घेतले असेल तर ते वेळेत मागे द्यावे.

आजार:-अनेकांना बरेच मोठे आजार होत असतात, या आजारांना बरे करण्यासाठी डॉक्टरांकडून वेगवेगळे औषधे मिळतात. अनेक लोक औषधाची पूर्तता पूर्णपणे करत नाही म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेला औषधांचा डोस पूर्णपणे घेत नाही.

अनेकदा असे होत असते की डॉक्टरांकडून औषधे दिल्यानंतर आपला आजार हा दोन ते तीन दिवसातच बरा होत असतो. त्यानंतर लोक गोळ्या औषधे घेणे बंद करत असतात. परंतु असे करणे खूप चुकीचे आहे. यामुळे भविष्यामध्ये पुन्हा आजार वाढण्याची शक्यता असते.

आग:- जर कुठे आग लागलेली असेल तर या आगीला पूर्णपणे विझवल्याशिवाय कोठेही जाऊ नये. जर तेथे एखादी छोटीशी ठिणगी जरी वाचली तरी एका महाकाव्य आगीमध्ये रूपांतर करू शकते. यामुळे जीवित व वित्तहानी देखील होऊ शकते. त्यामुळे या प्रकारच्या कामांना कधीही मध्येच सोडू नका.

Post a Comment

Previous Post Next Post