तूळ राशी:- शनि महाराजांच्या तूळ राशीत गोचर होण्याने तूळ राशीतील जातकांना खूप मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. शनि च्या आगमनाने राशींना न्यायिक बाबतीत सावध रहावे लागते!

न्यायाचे देवता असलेले शनिदेव कोणत्याही जातकाला न्यायाच्या तराजुतच मोजतात! आर्थिक अडचणी व पैशाच्या कमतरतेमुळे आरोग्य संबं'धी प्रश्न उभे राहण्याची शक्यता आहे. ज्या राशीमध्ये शनिमहाराज प्रवेश करतात त्या राशींवर संकटांचे ढग जमा होत असे म्हटले जाते! शनीच्या आपल्या राशी मध्ये येण्यामुळे आपल्याला हितशत्रुंपासून सावध राहण्याची खूप आवश्यकता आहे.

कुठल्याही कामात यशस्वी होण्याकरता आपल्याला या काळामध्ये थोडी जास्त मेहनत करण्याची आवश्यकता पडणार आहे. परंतु यासोबतच आपल्याला अचानक धनलाभाचे योग देखील चालुन येत आहेत. जर आपण राजनीती राजकारणामध्ये प्रवेश करू इच्छित असाल तर राजकारणामध्ये आपले नाव व आपला प्रभाव वाढवणारे ग्रहमान बनत आहे.

२. कुंभ राशी-

ज्योतिष शास्त्रानुसार कुंभ राशीच्या जातकांना या कालावधीमध्ये अधिक यश मिळणार आहे. वास्तु निर्माण सं'बंधी ज्या लोकांचे काम अडकले आहे त्यांना लवकरच आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरांमध्ये जाण्यासाठी चांगले ग्रहमान बनत आहे. घर निर्मितीच्या कार्यामध्ये वेग पकडणारे ग्रहमान आहे. विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयामुळे आपल्याला लाभ होणार आहे.

आपल्या जीवनात आपण जे पण कार्य करणार आहात ते गोरगरिबांच्या मदती करता व चांगल्या करता करणार आहात! अशा चांगल्या कामाकरता आपल्याला नेहमीच यश मिळेल. आपल्या जीवनसाथीच्या आरोग्यासं'बंधी चिंता या काळात वाढणार आहेत. खूप वर्षापासून अडकलेली काही कामे अचानक वेग घेताना दिसतील!

Post a Comment

Previous Post Next Post