पैसा ऐश्वर्य संपत्ती कोणाला नको असते? तो आजकाल पैशाच्या मागे धावत आहे. पैसा कमवण्याकरता लोक कोणत्याही थरावर काम करत आहेत. जगात असे अनेक लोक आहेत जे गैरमार्गाने पैसा कमवत आहेत. परंतु काही लोक अतिशय कष्टाने व घाम गाळून मेहनत करून रक्ताचे पाणी करून पैसा कमावतात. बऱ्याच लोकांचा मेहनत करुनही घरात पैसा टिकून राहत नाही.

या लेखाद्वारे आपल्याला घरामध्ये धन- संपत्ती, ऐश्वर्य, पैसा टिकून राहण्याकरिता काही वास्तू टिप्स देणार आहोत. ज्या वापरल्यास आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमी होणार नाही.

१. बुधवारी पैशाच्या तिजोरीमध्ये पैसे ठेवले असता घरामध्ये कधीही पैशाची कमी राहत नाही. तसेच वायफळ खर्च होत नाही व योग्य ठिकाणी पैसा खर्च होतो.

२. घरामध्ये वर्षातून दोन वेळा होम-हवन पूजा केली पाहिजे, ज्यामुळे घरामध्ये शांतता व समृद्धी नांदते व घरामध्ये पैसा टिकण्यासाठी प्रबळ वातावरण तयार होते.

३.संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावावा, त्यामुळे महालक्ष्मी माता प्रसन्न होते.

४. रोज घराची फरशी पुसताना त्या पाण्यात थोडी हळद टाकून त्या पाण्याने फरशीवर पोछा करावा, त्यामुळे घरात कायम लक्ष्मीमातेचा वास राहतो.

५.घराच्या उत्तर दिशेला पिरामिड ठेवल्यास देखील धनसंपत्तीचा अोघ घराकडे येण्यास सुरुवात होते व घरांमध्ये ऐश्वर्य नांदते.

६.आपल्या घराच्या पूर्व दिशेला संपत्ती पैसे व तिजोरी ठेवल्यास पैशाची बरकत होते.

७. ज्या कपाटामध्ये आपण पैसे किंवा दागिने ठेवतो त्या कपाटाला घराच्या उत्तर दिशेच्या खोलीमध्ये दक्षिणेकडे पाठ करून लावावे. त्यामुळे दरवाजा उघडताना उत्तरेकडे उघडेल व त्याचा फायदा आपल्याला धनसंपत्ती व दागिन्यांच्या भरभराटी मध्ये होईल!!

Post a Comment

Previous Post Next Post