प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याकडे भरपूर पैसा व संपत्ती असावी तसेच कधीही धनाची कमी येऊ नये. मात्र कधीकधी कुंडलीतील खराब ग्रहस्थिती मुळे व्यक्तीकडे पैसा येऊनही तो टिकत नाही किंवा कधीकधी पैसे देऊनही त्याला लगेच वाटा व फाटे फुटतात. आपल्याकडे येणाऱा पैसा कायमच टिकुन राहावा तसेच पैशाचा संचय व्हावा याकरिता अनेक उपाय केले जातात.
आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती टिकून राहण्यासाठी व आपले पैशाचे पाकीट कायम पैशाने भरणे भरून राहण्याकरता एक उपाय सांगणार आहोत.
कोणत्याही शुभमुहूर्तावर अक्षयतृतीया, पौर्णिमा किंवा दिवाळीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे! एक लाल रंगाचा नवीन रेशमी रुमाल घेऊन त्यावर तांदळाचे 21 दाणे ठेवावे. सर्व दाणे अखंड असले पाहिजे। लक्षात ठेवा एकही दाणा तुटलेला किंवा खराब नसाव. याची पुरचुंडी बांधून माता लक्ष्मी समोर विधीवत पूजा अर्चना करावी. त्यानंतर हे तांदूळ आपल्या पाकिटामध्ये लपवून ठेवावे.
हा उपाय केल्यानंतर आपल्याकडे माता लक्ष्मीची कृपा वाढते व आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. मात्र त्यासोबत आपल्याला एक खबरदारी घ्यावी लागेल, पैशाच्या पाकिटामध्ये कोणत्याही चुकीच्या वस्तू ठेवू नये. पैशाचे पाकीट भरतांना नाणे बाजूला ठेवावे व नोटा बाजूला ठेवाव्या.
पैशाच्या पाकिटामध्ये कधीही अवास्तव वस्तू कोंबू नये. तसेच नको ते कागद ठेवू नये. पैशाच्या पाकिटामध्ये कधीही अधार्मिक वस्तू ठेवू नये, ज्यामुळे आपल्याला हानी होईल! तर हे होते घरामध्ये पैसा टिकून राहण्याकरिता करावयाचे उपाय...! या उपायांमुळे आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही व लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर बरसेल!
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
Post a comment