आज प्रत्येक व्यक्ती जगामध्ये पैशामागे धावत आहे. धनप्राप्ती आणि सुख समृद्धी करता प्रत्येक व्यक्ती दिवसरात्र कष्ट करत आहे. पण बरेचदा खूप मेहनत करून देखील योग्य मोबदला मिळत नाही, तसेच काही व्यक्तींकडे संपत्ती टिकतच नाही! तर काही व्यक्तींकडे पैसा येत नाही तोपर्यंत त्याला वाटा फुटतात व सगळे पैसे संपून जातात! अगदी बचतही करता येत नाही.ज्योतिष शास्त्रामध्ये धनसंचयाकरता व धन टिकून राहण्याकरिता काही उपाय सांगितलेले आहेत.
आज आम्ही या लेखाद्वारे आपल्याला ज्योतिषशास्त्र द्वारे सांगितलेल्या काही उपायांबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे घरात धनसंपत्ती कायम राहील व घरामध्ये सुख शांती नांदू शकेल!!
ज्योतिष शास्त्रानुसार महालक्ष्मी मंदिरामध्ये सलग 7 शुक्रवार धूप -अगरबत्ती दान केल्यामुळे धनप्राप्ती होते. ज्योतिष शास्त्रामध्ये आणखी एक उपाय सांगितला आहे तो म्हणजे पुष्य नक्षत्राच्या कोणत्याही रविवारी बेहडा या वृक्षाचे मुळी व पान घेऊन त्यांची यथोचित पूजा करून, लाल कपड्यांमध्ये बांधून आपल्या घरातल्या तिजोरीमध्ये ठेवावे आणि रोज त्याला धूप व दिव्याची आरती करून पूजा-अर्चना करून नमस्कार करावा. या उपायाने आयुष्यभर आपल्या घरांमध्ये धनाची कमी राहत नाही व कुटुंबांमध्ये सुख समृद्धी नांदू लागते.
गुरुवारी तुळशीच्या रोपाला दूध वाहिल्यामुळे घरांमध्ये महालक्ष्मीची कृपा दृष्टी बरसते व घरामध्ये कधीही धनाचा अभाव राहत नाही. शुक्रवारी गरीब लोकांना गूळ व चणाडाळ दान केल्याने तसेच मंगळवारी माकड किंवा वानरांना चणे फुटाणे खाऊ घातल्यास आर्थिक स्तरामध्ये वृद्धी होते आणि नव- नवे आर्थिक स्त्रोत निर्माण होतात.
ज्या ठिकाणी आपण झोपता त्या ठिकाणी कधीही उष्टी व खरकटी भांडी ठेवू नयेत, त्यामुळे आपल्या उद्योग व्यवसायामध्ये मोठे नुकसान होऊ शकते. घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुळशीचे रोप ठेवल्याने उधारी उसनवारी यासारख्या गोष्टीतून पोहोचत नाही.
तर हे होते घरात धनसंपत्ती टिकुन राहण्याकरता काही ज्योतिषशास्त्रीय उपाय!
Post a comment