जीवन आणि मृत्यू हे जीवनाची सच्चाई आहे. या पृथ्वीतलावर ज्याने जन्म घेतला आहे त्याला या पृथ्वीतलावरून केव्हा ना केव्हा जायचे आहे. असे सांगितले जाते की आपल्या शरीरातून आपली आत्मा आपले शरीर त्यागून दुसरे शरीर धारण करत असते.
आपली आत्मा आपल्या शरीराला त्यागून परमात्मा धाम मध्ये जाण्यासाठी आपल्या कर्मानुसार पुढे जात असते. शास्त्रामध्ये मृत्यूचे तीन प्रकार सांगितले गेले आहेत. हे प्रकार म्हणजे भौतिक, मानसिक आणि अध्यात्मिक.
1. भौतिक:- कोणत्याही दुर्घटनेमुळे किंवा आजारामुळे मृत्यू होणे म्हणजेच भौतिक कारणामुळे मृत्यू होणे असे आहे. अशावेळी भौतिक तरंग अचानकपणे मानसिक तरंगांना सोडून देतात आणि आत्मा शरीराचा त्याग करत असतो.
2. मानसिक:- कधीकधी आपण एखाद्या दुर्घटने विषयी विचार करत असतो. ज्याविषयी आपण कल्पनादेखील करू शकत नाही आणि अशातच तुम्हाला भीतीमुळे हार्ट अटॅक येऊन जातो व त्यामुळे तुमचा मृत्यू देखील होत असतो. या कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूला मानसिक मृत्यू म्हटले जाते. अशा काळामध्ये भौतिक तरंग मानसिक तरंगापासून वेगळे होत असतात आणि त्यामुळे माणसाचा मृत्यू होत असतो.
3.अध्यात्मिक:- मृत्यूचे तिसरे कारण अध्यात्मिक आहे. अध्यात्मिक साधनेमध्ये मानसिक तरंग चा प्रभाव प्रवाह जेव्हा अध्यात्मिक प्रवाहामध्ये सामील होत असतो तेव्हा व्यक्तीचा मृत्यू होत असतो. कारण भौतिक शरीर म्हणजेच तरंगातून मानसिक तरंगात तारतम्य सुटत असते.
ऋषिमुनींनी याला महामृत्यु म्हटले आहे. धर्मग्रंथानुसार महामृत्यु आल्यानंतर नवीन जन्म होत नाही आणि आत्मा जीवन-मरणाच्या बंधनातून मुक्त होत असतो.
Post a comment