तसे तर बॉलिवूड मध्ये हिरोंना व विलन ना काही कमी नाही. ज्याप्रमाणे चित्रपटांमध्ये हिरोची भूमिका महत्त्वाची असते. त्याच प्रमाणे खलनायकाची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची असते. अनेकदा चित्रपट हा खलनायका मुळेच हिट ठरत असतो.

आज आम्ही तुम्हाला बॉलीवूड मधील एका अशा अभिनेत्या विषयी सांगणार आहोत हा अभिनेता अगोदर गल्ली गल्ली मध्ये जाऊन कपडे धुण्याचे पावडर विकत होता. परंतु आज हा अभिनेता बॅडमॅन नावाने ओळखला जातो.

अनेकांना आता कळालेच असेल की हा खलनायक अभिनेता कोण आहे. त्याच्याकडे आता खूप संपत्ती आहे. या अभिनेत्याचे नाव आहे गुलशन ग्रोवर आहे. गुलशन ग्रोव्हर यांचा जन्म साल 1955 मध्ये दिल्लीच्या एका सामान्य परिवारामध्ये झाला होता. त्यांनी सफलता मिळवण्यासाठी खूप मेहनत केली होती.

तेव्हा जाऊन ते आता खूप मोठे स्टार बनले आहेत. सामान्य आणि मध्यमवर्गीय परिवारामध्ये जन्म घेतल्यामुळे गुलशन ग्रोवर यांचे बालपण अनेक कठीनाईपासून गेले होते. जेव्हा त्यांचा शाळेचा वेळ हा दुपारचा होता तेव्हा ते सकाळी सात वाजता उठत व शाळेचा युनिफॉर्म घालून कपडे धुण्याचे व भांडी घासण्याची पावडर गल्ली गल्ली मध्ये घेऊन विकत असे.

तसेच ते सोबत फिनाईल च्या गोळ्या देखील विकत असे. अशा प्रकारे ते आपल्या घराला कसेबसे मदत करत असे. परंतु आता ते बॉलीवूड मधील एक मोठे दिग्गज बनले आहेत व त्यांना खूप मानसन्मान देखील मिळत असतो.

Post a Comment

Previous Post Next Post