आचार्य चाणक्य यांना नितीशास्त्रात आणि अर्थशास्त्रात महान मानले जाते. चाणक्य यांनी नीतिशास्त्रात संपत्ती आणि प्रगती या संदर्भातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आजही या गोष्टी लोक मानतात. असे म्हटले जाते की, आचार्य चाणक्य यांच्या नीती मानणे खूप अवघड असते. पण जे लोक या नीती मानतात आणि तसे वागतात, त्यांना कोणीच त्यांच्या प्रगतीपासून अडवू शकत नाहीत.

चला तर मग,आपण बघूया संपत्ती आणि प्रगती याबाबद्दल नीतिशास्त्रातील आचार्य चाणक्य यांची मांडणी.

आव्हानांसाठीं नेहमी तयार रहा - चाणक्य नीतीनुसार,जर तुम्हाला जीवनात प्रगती करायची असेल तर तुम्ही आधी स्वतःचे ध्येय निश्चित करा. यावरून तुम्हाला समजेल की आपल्याला कोणत्या दिशेने वाटचाल करायची आहे. ध्येय निश्चित केल्यामुळे आपला वेळ वाया जात नाही. संपत्ती आणि प्रगती मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने नेहमी आव्हानांना सामोरे जाण्यास तयार असले पाहिजे.

चुकीच्या मार्गांचा वापर करू नका - चाणक्य यांनी सांगितले आहे की, आपल्या आयुष्यात संपत्ती आणि प्रगती मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गांचा वापर करू नका. चुकीच्या मार्गाने गेल्यास आपले नेहमी नुकसानच होते. तसेच संपत्ती मिळवण्यासाठी शत्रू सोबत मैत्री करू नका.

संपत्तीचा योग्य उपयोग - चाणक्य नीतीप्रमाणे केवळ संपत्ती मिळवणे गरजेचे नसते तर त्याचा योग्य उपयोग करणेसुद्धा तेवढेच गरजेचे असते. मिळवलेल्या संपत्तीचा किंवा पैशांचा आपण योग्य उपयोग केला नाही तर तो पाण्यासारखा वाहत जातो म्हणजेच वाया जातो. म्हणूनच संपत्तीचा नेहमी योग्य प्रमाणात वापर करावा.

खर्चावरील नियंत्रण - आपण जर आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवले नाही तर कितीही पैसे कमवून आपण श्रीमंत होऊ शकत नाही. चाणक्य यांनी असे सांगितले आहे की, जसं आपण एकाच भांड्यात तेच पाणी जास्त दिवस ठेवले, तर ते काही दिवसांनी खराब होऊन जाते. तसेच जर आपण खर्चावर नियंत्रण ठेवू शकलो नाही तर आपली अधोगती होऊ शकते.

सर्वाधिक दान - शास्त्राप्रमाणे दान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. यात चाणक्य यांनी म्हटले आहे की, आपण जेवढं कमावतो त्याप्रमाणातच बचत करा आणि इतरांना मदत करा.

Post a Comment

Previous Post Next Post