आपल्या सर्वांना माहिती आहे कि शनिवार हा भगवान शनिदेवाचा असतो. या दिवशी भगवान शनीदेवाची मनोभावाने पूजा केली जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का की शनिवार हा राम भक्त श्री बजरंग बली यांचा सुद्धा वार असतो. या दिवशी बजरंग बली ची मनोभावे पूजा देखील केली जाते.

हनुमानाला अत्यंत बलशाली असे दैवत मानले जाते. महाबली हनुमानाची कृपा दृष्टी जर एखाद्या मनुष्यावर झाली तर अशा मनुष्याचे कल्याण होत असते. तुम्हाला असे वाटत असेल की महाबली हनुमानाची कृपादृष्टी तुमच्यावर निरंतर रहावी. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात तसेच भगवान शनिदेव यांची देखील कृपादृष्टी तुमच्यावर निरंतर रहावी.

त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या बरोबर असावा असे तुम्हालाही वाटत असेल तर यासाठी शनिवारच्या दिवशी हे काही उपाय करून बघा. महाबली हनुमान व भगवान शनिदेव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत हे उपाय.

जर तुम्हाला शनिदेवाची साडेसाती खूपच त्रास देत असेल, यामुळे तुमच्या कामांमध्ये अडथळा येत असेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय नक्की करावा. यासाठी शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या भोवती दोन्ही हाताने स्पर्श करावा व त्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या सात परिक्रमा पूर्ण कराव्यात.

परिक्रमा पूर्ण करताना हा एक मंत्र सतत म्हणत रहावा तो म्हणजे, "ओम शनेश्वराय नमः" हा मंत्र सात प्रदक्षिणा पूर्ण करताना मनातल्या मनात म्हणत राहावा. यामुळे शनीची कृपादृष्टी तुमच्यावर राहील व काही दोष असेल तर तो नष्ट होईल. जीवनातील साडेसाती देखील कायमची दूर होईल.

दुसरा उपाय असा आहे की शनिवारच्या दिवशी भगवान हनुमंताची पूजा करावी. शनिवारच्या दिवशी नियमित स्वरूपात हनुमान चालीसा चे वाचन करावे. तसेच या दिवशी अंगणामध्ये येणाऱ्या चिमण्यांना दाणे टाकावे. असे केल्यास तुमचा सर्व दोष नाहीसा होत असतो. यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात.

Post a Comment

Previous Post Next Post