कुंभ राशीच्या जातकांना हा काळ अतिशय सुखाचा व अनुकूल जाणार असून या काळामध्ये राहू-केतू हे दोन्ही ग्रह आपल्यावर एकसाथ प्रसन्न होत आहेत. आपल्याला प्रत्येक कामांमध्ये घवघवीत यश मिळणार आहे. विवाहेच्छु तरुणांना चांगले स्थळ चालून येणार आहे व लवकरच विवाहाचा योग बनत आहे.

श्रीमंत घरी विवाह योग जुळून येणार आहे. नोकरदार वर्गाला सुगीचे दिवस येणार आहेत. आपल्या कामाची वरिष्ठांकडून मनापासून प्रशंसा होणार आहे. या काळात वरिष्ठांच्या मर्जीमध्ये आपण राहणार आहात व प्रमोशनही आपल्याला लवकरच मिळणार आहे.

उद्योग व्यवसाय व व्यापार करणाऱ्या जातकांना अर्थप्राप्तीचे व आर्थिक लाभाचे योग येणार आहेत. थांबलेली कामे अचानक गती घेतील. आपल्या कामातील सर्व अडसर दूर होऊन काम वेळेत पूर्ण होणार आहे. राहू-केतू आपल्यावर अति-प्रसन्न असून आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश आणि कीर्ती प्रदान करणार आहेत.

विद्यार्थी वर्गाचे या काळामध्ये अध्ययनामध्ये मन रमणार असून चांगल्या यशप्राप्तीचे योग आहेत. आरोग्याच्या समस्या थोड्या प्रमाणात उद्भवू शकतात, मात्र या काळात आपल्याला सुख-समृद्धी धनसंपत्ती आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद आणि वरदहस्त आपल्या डोक्यावर राहणार आहे.

राहू-केतू ज्या जातकावर प्रसन्न असतात त्याच्या प्रगतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असते. कुंभ रास ही अतिशय नशीबवान रास असून, या काळामध्ये राहू आणि केतू या दोन्हीच्या आशीर्वादाची बरसात या राशीच्या जातकांना मिळणार आहे! राहु-केतूच्या कृपादृष्टीमुळे या राशीच्या जातकांना कोणत्याही कामात येणार यश आणि कीर्ति मिळणार आहे.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Post a Comment

Previous Post Next Post