उत्तरायण म्हणजेच मकर संक्रांति!! आजच्या दिवशी सूर्य मकर राशीत संक्रमण करणार आहे. सूर्याचे हे संक्रमण संपूर्ण भारतामध्ये मकरसंक्रांतीचा सण म्हणून साजरे केले जाते. असे म्हटले जाते, की आज जे काही दान- पुण्याचे कामे केली जातात ते सूर्यदेवाला अर्पण होतात आणि त्याचे ईप्सित फळ सूर्यदेव जातकाला कुंडलीनुसार देत असतात. जे व्यक्ती आजच्या दिवशी दान पुण्याची कामे करतात त्या व्यक्तींना सूर्यदेवाकडून विशेष आशीर्वाद मिळतं असतात.

यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी देवी महालक्ष्मी देखील चार राशींवर सुख आणि समृद्धीचा वर्षाव करणार आहे. या राशींच्या जातकांनी आतापर्यंत जे कष्ट, दुः-ख, यातना भोगलेल्या आहे, त्यांना यातून दिलासा मिळणार आहे आणि सुखाच्या पर्वाची एक नवी सुरवात त्यांच्या आयुष्यात पाहतांना मिळणार आहे! ज्या लोकांची अनेक वर्षापासून कामे अडकलेली आहेत ती कामे देखील या मकर संक्रांती पासून पूर्ण होणार आहेत.

तसेच ज्यांच्या घरांमध्ये कायम वाद-विवाद,कोर्ट-कचेऱ्या यासारखी जमिन-जुमला व भावकीची वाद प्रकरणे चालू होती, त्यातून आता शांतता मिळणार आहे. ज्यांचे दांपत्यजीवन काही काळापासून विस्कळीत झाले होते, त्यांना आता एक नवी उभारी मिळणार असून पती-पत्नीमधील वाद संपुष्टात येणार आहेत व नवीन दाम्पत्य जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धीला सुरुवात होणार आहे.

संततीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या जातकांना संतती सुखाचा लाभ मिळणार आहे. वास्तूचे, घराचे किंवा स्वतःच्या वाहनाचे स्वप्न बघणार्‍य‍ा जातकांना यावेळी वाहन, वास्तू -योग जुळून आले आहेत. देवी महालक्ष्मी त्या राशींवर आता आपली कृपा-दृष्टी ठेवत आहे. त्यामुळे धनप्राप्तीचे व संपत्तीचे योग्य अशा जातकांना चालून येतात व अडलेली कामे सफल होतात.

मकर संक्रांतीच्या दिवशी महालक्ष्मीची मनोभावे पूजा करुन,महालक्ष्मी स्त्रोताचे वाचन करावे, नैवद्य दाखवुन मनोकामना देवीला सांगावी, लवकरच तुमचे इप्सित फळं साध्य होणार आहे. देवी महालक्ष्मी तुमचे सर्व मागणे ऐकणार आहे! ज्या राशींवर महालक्ष्मी प्रसन्न होणार आहे व आपली कृपा बरसवणार आहेत, त्या राशी आहेत मेष,कर्क वृषभ आणि कुंभ!

Post a Comment

Previous Post Next Post