ज्यावेळी एखाद्या राशीच्या जातकाच्या कुंडलीमध्ये राहू ग्रह अ-शुभ स्थितीमध्ये असतो किंवा राहूचे कुंडलीतील स्थान कमजोर घरात असते. तेव्हा त्या जातकाच्या जीवनामध्ये अनेक आक-स्मिक घटना घडतात. काही क्षणांमध्ये राहू ग्रहाच्या ग्रह स्थितीमुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल घडू लागतात. अचानक दुखापत होणे, पडणे अशा घटना राहुकालात घडत असतात.

राहू हा छाया ग्रह आहे. राहुची स्वतःची कोणतीही राशी नाही. सर्व राशींमध्ये हा आपल्या कुंडलीतील स्थानानुसार बरे वा-ईट फळ देत असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहू ज्या कुंडलीमध्ये अशक्त अथवा वा-ईट स्थिती मध्ये असतो, तेव्हा त्या जातकाच्या आयुष्यामध्ये आकस्मिक संकटांचा मारा व्हायला सुरुवात होते. या सर्व स-मस्यांपासून सुटका मिळण्यासाठी राहु ध्यानमंत्राचे उच्चारण केले पाहिजे.

राहू ध्यानमंत्र:-

कराल वदनः खड्गचर्मशूली वरप्रदः

नील सिंहासनस्थश्च राहुरत्रप्रशयते

राहूच्या या ध्यानमंत्रामुळे अप्रत्यक्ष घडणाऱ्या घटना देखील कमी होऊ लागतात. ज्या व्यक्तींच्या कामांमध्ये नेहमी अडचणी येत असतात किंवा अडथळे येत असतात त्या व्यक्तींना स्थिरता लाभते. शुक्र आणि शनी हे राहू चे मित्र ग्रह आहेत. केतूग्रह राहूपासून नेहमी 180° कोणामध्ये स्थित असतो.

राहूचा हा मंत्र शनीच्या दो-षांमध्ये देखील कामी येतो. राहूच्या या ध्यानमंत्राचा आरंभ उच्चारणा सोबत करावा. हळूहळू हा मंत्र नियंत्रित होतो आणि आपली ध्यानधारणा देखील वाढते.

मौन अवस्थेमध्ये या मंत्राचा जप करावा. ज्यामुळे आपल्यामध्ये धैर्य व सहनशक्ती वाढते. ज्या जातकांच्या कुंडलीमध्ये पितृदो-ष किंवा ग्रहदो-ष दाखवलेला आहे, त्यापासून देखील या राहू मंत्रामुळे मुक्ती मिळते.

राहू संबं-धीचे पदार्थ जसे रासायनिक पदार्थ, विस्फोटक पदार्थ व समाजांमधील कमी स्तराचे मानले जाणारे जे कार्य आहेत त्या लोकांनी या मंत्राचा जप केल्यास त्यांना त्यामध्ये यश मिळते. घराच्या नैऋत्य कोपऱ्यातील वास्तु सं-बंधी दोष देखील या मंत्राने दूर होतात.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैर-समज करून घेऊ नये.

Post a Comment

Previous Post Next Post