10 फेब्रुवारी रात्री दिड वाजता शनी उदय होणार आहे व याचा काही राशींवर प्रभाव होणार आहे. ज्योतिषांनुसार शनी उदयामुळे पाच राशींना शुभ फळ मिळणार आहेत. प्रत्येक कार्यामध्ये यशप्राप्ती होणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पाच राशी?

१. मेष रास- शनि उदयामुळे मेष राशीच्या जातकांना शुभ फळ मिळणार आहेत. या लोकांचा चांगला काळ सुरू झालेला असून आर्थिक समस्या दूर होतील. कुटुंबातील संबंध चांगले होतील. तसेच जमीन व्यवहारातून आपल्याला लाभ मिळणार आहेत. व्यापारामध्ये प्रगती होईल. नोकरीत लाभ होईल.

२. कन्या रास- कन्या राशीच्या जातकांना धनलाभ होणार असून नोकरी आणि व्यापारामध्ये चांगली यशप्राप्ती होईल. तसेच अनेक दिवसांपासून चाललेले वादविवाद संपतील व मानसिक तणाव संपून आपल्याला स्वस्थता लाभेल.

३.मकर रास- आपण केलेल्या मेहनतीचे आता चांगले फळ मिळणार आहे. तसेच आपल्याला धनलाभाचे योग येणार आहेत. आपले विचार सकारात्मक ठेवा व लगातार मेहनत करा. आपल्याला यश निश्चित मिळणार आहे.तसेच आपले कुटुंबातील लोकांशी संबंध सुधारतील. विवाहाचे योग देखील आपल्याला चालून येतील.

४. मिथुन रास- शनि उदयामुळे मिथुन राशीच्या लोकांना प्रगती व धनलाभ देखील मिळणार आहे. हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे. तसेच धनलाभ देखील होणार आहे. पैसा गुंतवणुकी करता हा काळ चांगला आहे. तसेच शेअर बाजार व जमिनीसंबंधी निर्णय घेण्यासाठी हा काळ चांगला आहे.

५. मीन रास- शनी उदय होत असल्यामुळे मीन राशीच्या लोकांना प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होणार आहे. व्यापारामधून लाभ मिळेल. तसेच परिवारामध्ये मंगल कार्य घडून येईल. प्रवास शुभ ठरतील. विचारपूर्वक निर्णय घेऊन कार्य करत राहावे.

तर या होत्या त्या 5 राशी ज्यांमध्ये शनी उदयामुळे शुभ प्रभाव दिसणार आहे.

बाकी राशींना शनिदेवाच्या प्रकोपापासून वाचण्याकरता शनिवारी काळी घोंगडी, काळे कपडे किंवा काळ्या दाळीचे दान करावे. हनुमानाची पूजा केल्यामुळे शनिदेवांचा प्रकोप शांत होतो. शनिवारी हनुमान मंदिरामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.शनि देवाची पूजा करताना काळे तीळ अर्पण करावे.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Post a Comment

Previous Post Next Post