मेष - आज तुमच्या जीवनात काही नवीन गोष्टी होतील. आज तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळतील. नवीन ओळखी आज फायदेशीर असतील. आज प्रवास संभवतो. वडीलधाऱ्या माणसांची मदत होईल. वृषभ -

आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला असेल. आज आपण गुंतवणुकीचा विचार करू शकता. व्यवसायिकांना आजचा दिवस लाभदायक असेल. परिवारातील वादविवाद संपतील. 

मिथुन - खर्च वाढू शकतो. पैशासंबंधीत अडचणी येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. 

कर्क - जीवन साथीदारासोबत भांडणे टाळण्याचा प्रयत्न करावा लागेल. व्यापारात किंवा व्यावसायिकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा.

सिंह - असे कोणतेही काम करू नका की ज्यामुळे तुम्हाला समस्या होऊ शकतील. आरोग्याविषयी काळजी घ्यावी लागेल. तब्येत बिघडू शकते. आर्थिक नुकसान होण्याची संकेत आहेत. विरोधकांकडून त्रास होऊ शकतो. कन्या - बुद्धीने आणि कलात्मकतेने केलेली व्यावसायिक कामे पूर्ण होतील. आणि तुमची प्रगती होईल. कुटुंबातील सदस्यांकडून आनंदाची बातमी मिळेल. नवीन ओळखी होऊ शकतात.

तूळ - आज आपल्याला आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबात प्रतिष्ठा वाढेल. मन सम्मान मिळेल. जीवन साथीचा सहयोग मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

वृश्चिक - आज तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तरीही आज कामे पूर्ण होऊ शकतात. आज तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आज लाभदायी दिवस असेल.

धनु - आर्थिक समस्या वाढतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही कामात जोखिम घेऊ नका. बुद्धी आणि कौशल्याने केलेल्या कामात प्रगती होईल. मकर - आरोग्यविषयक जागरूक राहावे लागेल. विनाकारण अडचणी येऊ शकतात. नकारात्मक विचारांपासून लांब राहा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. 

कुंभ - शासकीय कामात अडथळे येऊ शकतात यामुळे तणाव वाढू शकतो. आर्थिक परिस्थिती काळजीयुक्त असेल. व्यावसायिकांना पैशांच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल.

मीन - आज तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. 

आर्थिक गोष्टींमध्ये जोखीम घेऊ नका. आनंदी आणि शांतपणे आज कामे पूर्ण करा. आरोग्य चांगले राहील.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Post a Comment

Previous Post Next Post