रोज घरातील सासू आणि सूनेमधील भांडणे घरातील इतर सदस्यांवर देखील परिणाम करतात. अशा घरात लक्ष्मी राहत नाही. घरात नकारात्मक विचार राहतात. घरात सुख येत नाही. यामुळे घरातील वातावरण बिघडते आणि घरात सुख शांती कोणालाच मिळत नाही. याचा परिणाम लहान मुलांवर, त्याच्या अभ्यासावर सुद्धा होतो, तसेच घरात अजूनही मोठी माणसे असतील तर त्याला आरोग्याच्या समस्या उदभवतात.

भांडणे हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जो कोणालाच सुखी ठेवत नाही. ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगितले आहेत की याद्वारे सासू आणि सुनेची भांडणे टाळता येऊ शकतात. या उपायांबद्दल आपण आता जाणून घेऊया. सासू आणि सून यांच्यातीळ संबंध चांगले होण्यासाठी सकाळी लवकर उठा. सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी घराबाहेर कचरा काढून टाकणे आवश्यक आहे. घरात कोणत्याही प्रकारची घाण किंवा धूळ होऊ देऊ नका.

जर सून दररोज सकाळी सूर्यदेवाला गूळ मिसळलेले पाणी देत ​​असेल तर तिच्या सासू सोबतचे नाते गोड राहतील. सासू आणि सून यांमध्ये अधिक वाद असल्यास दोघांनीही गळ्यात चांदीची साखळी घालावी. जर हे करणे शक्य नसेल तर आपल्याकडे चांदीची छोटी गोळी ठेवा. जर सून आपल्या सासूला १२ लाल आणि १२ हिरव्या काचेच्या बांगड्या भेट करील तर यामुळे दोघांमधील भांडणे कमी होतील.

जर रोज पूजा झाल्यावर सून कपाळावर हळद किंवा कुंकू लावत असेल तर त्या दोघांमधील संबंध सुधारतील. शुक्रवारी देवीला सुनेने सोनेरी लाल रंगाची साडी अर्पण करावी आणि मग ती साडी सासूला भेट म्हणून द्यावी, यामुळे ही समस्या टाळता येऊ शकते.

प्रत्येक पौर्णिमेला सूनेने गोड खीर बनवून आपल्या सासूला खायला द्यावी आणि त्यांच्याबरोबर स्वतः सुद्धा खावी, म्हणजे त्यांच्यात चांगले संबंध होऊ शकतात.

Post a Comment

Previous Post Next Post