पैसे कमवण्याकरता आपण दिवस रात्र मेहनत करत असतो. मात्र पैसे येतात तसे निघून पण जातात! पैशाला अनेक वाटा फुटतात! आपल्याकडे पुरेसे धन असेल व त्याचा व्यवस्थित संचय केला असेल तर आपण भविष्याकरता तरतूद करू शकतो.

बरेच लोक पैसा कमवून देखील मनासारखा धनसंचय करू शकत नाहीत. अशा लोकांच्या घरांमध्ये दररोज वेगवेगळी आजारपण येतात, नवे खर्च सुरु होतात तसेच अचानक काहीतरी आर्थिक संकट व हानी होवून सगळा पैसा खर्च होऊन जातो!

मग पैसे घरात टिकतील तरी कसे?

आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे हळकुंडापासून एक साधा सोपा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे महालक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल व आपल्या घरामध्ये कधीही धनसंपत्ती व पैशाची कमतरता होणार नाही.

हा उपाय करण्याकरता आपल्याला बाजारातून दोन सगट हळकुंड घेऊन यायचे आहेत. आता देवासमोर एक दहा रुपयाची नोट ठेवून त्या नोटेवर ही 2 हळकुंडे ठेवा. देवघरात महालक्ष्मीच्या प्रतिमेसमोर एक तुपाचा दिवा लावा. या दिव्यामध्ये दोन सगट लवंगा टाका देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णुंचे नामस्मरण करून त्या नोटेवर अक्षदा, लाल रंगाची फुले वाहून पुजा करा.

थोड्या वेळाने देवासमोरचा दिवा आपोआप विझल्यावर दिव्यामधील त्या दोन लवंगा काढून घ्या व हळकुंडावर ठेवा. त्या नोटीची अशाप्रकारे घडी करा की हळकुंड व लवंगा बाहेर येणार नाहीत. नोटेला लाल रंगाच्या धाग्यांनी अकरा वेळा गुंडाळून नोटेची पुटळी बांधा.

आता ही पुटळी आपल्या तिजोरीमध्ये किंवा जिथे आपण पैसे ठेवतो त्या जागेवर ठेवा.

हा उपाय केल्याने आपल्याला आर्थिक लाभ वाढण्यास सुरुवात होईल तसेच आपल्याला अनेक मार्गाने धनसंपत्ती अर्जित करता येईल.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Post a Comment

Previous Post Next Post