जेव्हा आपण दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री झोपण्याकरता अंथरुणावर अंग टाकतो. तेव्हा काही लोकांना अचानक झटका येतो व असे वाटते की कोणीतरी आपल्याला खाली पाडून देत आहे किंवा आपण कुठेतरी खाली पडत आहोत असा भास होतो! असे झटके येण्यामागे एक मनोवैज्ञानिक कारण आहे.

आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे या मनोवैज्ञानिक कारणाची माहिती सांगणार आहोत. रात्री झोपेत असताना किंवा झोपण्याचा प्रयत्न करत असताना झटका येणे किंवा अचानकच आपण कुठेतरी खाली पडलो अशी भीती वाटणे याला हिपनिक जर्क असे म्हणतात.

ही एक मनोवैज्ञानिक संकल्पना आहे. असे होण्याचे कारण म्हणजे आपण झोपण्याच्या अगोदर अधिक एक्झरसाइज केली असेल त्यामुळे आपल्या स्नायुंवर तणाव येतो व स्नायुंच्या ऍक्टिव्हिटीमुळे ही समस्या निर्माण होते.

अति प्रमाणामध्ये चहा किंवा कॉफी यासारखे पदार्थ वारंवार प्यायल्याने तसेच जे लोक रात्रभर जागरण करतात. लवकर झोपत नाहीत अशा लोकांमध्ये देखील ही समस्या पाहायला मिळते! जगभरामध्ये ५० ते ६० टक्के लोकांना ही समस्या आहे. अनिद्रेचा त्रास असनार्‍या लोकांना देखील ही समस्या भेडसावत असते. लहान मुले, म्हातारी माणसे सर्व वयोगटातील लोकांना ही समस्या होऊ शकते.

या समस्येचे मूळ कारण म्हणजे थकवा आल्यानंतर पुरेसा आराम न करणे. यामुळे अशा प्रकारचा हिपनिक जर्क होत असतो. आपल्या स्नायूंना आराम मिळाला नाही तर स्नायू असे झटके मारतात. ज्यामुळे आपली अचानक जाग येते.

अ-ल्कोहोल, सि-गरेट यासारख्या व्यसनांपासुन दूर राहिले पाहिजे. परंतु काही लोकांना जर ही समस्या पुन्हा पुन्हा झटके येत असतील तर अशा लोकांनी चांगल्या डॉक्टरकडे जाऊन यावर औषधोपचार घेतले पाहिजे!

Post a Comment

Previous Post Next Post