आजकाल पैशाला खूप महत्त्व आले आहे. पैसा हा जीवनाचे साधन बनला आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो सर्व सुखसोयी व सुविधा प्राप्त करू शकतो.चांगले जीवन जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे. मात्र अनेक लोक खूप मेहनत करून देखील हवा तेवढा पैसा कमवू शकत नाही व नियमित नित्याच्या गरजा देखील पूर्ण करू शकत नाहीत.

आज आम्ही या लेखाद्वारे आपल्याला पैसा प्राप्त करण्यासाठी व धनप्राप्तीसाठी असे काही पाच उपाय सांगणार आहोत ज्यामुळे आपल्याला धनप्राप्ती होईल. चला तर पाहूया कोणते आहे ते उपाय?

१.पुराण शास्त्रानुसार असे सांगितले गेले आहे की, ज्या घरांमध्ये नियमित श्रीसूक्त व लक्ष्मीसूक्त पठण केले जाते त्या घरांमध्ये महालक्ष्मीचा कायम वास राहतो. महालक्ष्मीचा वार असलेल्या शुक्रवारी तुम्ही या सुक्तांचे पठण केले तर आपल्याला कुठल्या प्रकारे आर्थिक समस्या शिल्लक राहणार नाहीत व महालक्ष्मीची कृपा आपल्या घरावर बरसेल.

२.वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक ऊर्जा आपल्या घरांमध्ये सर्व प्रकारच्या अडचणी आणत असते. कौटुंबिक कलह असलेल्या ठिकाणी महालक्ष्मी माता कधीही थांबत नाही. याकरता आठवड्यातून एकदा आपण सेैंधवमीठ पाण्यात टाकून घरामध्ये पोछा जरूर करावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर निघून जाते व घरामध्ये सुख शांती राहते.

३.प्रत्येक अमावास्येच्या दिवशी आपण घराची चांगली साफसफाई करावी. घरामध्ये ठेवलेले भंगार सामान बाहेर काढून द्यावे किंवा विकून टाकावे. घरातील देवघरामध्ये पाच अगरबत्ती लावाव्यात. त्यामुळे घरांमध्ये शुभ प्रभाव होऊ लागतो.

४.पौर्णिमेच्या दिवशी शेणाची गौरी जाळून त्यावर 108 वेळा मंत्रांची आहुती द्यावी. यामुळे आपल्या घरांमध्ये धार्मिक भावना उत्पन्न होते. घरातील सर्व समस्या दूर होतात. याशिवाय गौरी जाळून त्यावर धूप पेटवून तो धूर घरातून फिरवावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार करू लागते.

५. जर आपण आर्थिक अडचणींनी खूप त्रस्त असाल तर आपण गुरुवारी पिंपळाच्या झाडाला साधे पाणी अर्पण करावे व पिंपळाच्या खाली तेलाचा दिवा लावावा. शनिवारी गुळ आणि दूध मिश्रित पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. सोबतच मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाखाली लावावा. यामुळे आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होईल.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Post a Comment

Previous Post Next Post