शुक्रवार हा वार देवी लक्ष्मीला समर्पित केलेला आहे. आई लक्ष्मी ही धन आणि संपत्तीची देवी आहे असे मानले जाते. ती भगवान विष्णूंची अर्धांगिनी आहे. ज्यांच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो , अशा लोकांवर आणि त्यांच्या घरात नेहमीच शांती व समृध्दी नांदत असते. परंतु बर्याच वेळा आपण नकळत अशा काही चुका करतो, ज्यामुळे केलेली पूजा आपल्याला फळत नाही. तर आज आपण बघुयात लक्ष्मी देवीची उपासना योग्यरीत्या कशी केली जाते.
देवी लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी पांढरे किंवा गुलाबी रंगाचे कापड घाला. देवीची उपासना करण्याची चांगली वेळ म्हणजे मध्यरात्र. देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी, कमळावर बसलेल्या आणि हातात पैशांची वर्षाव करणारे चित्र निवडा. जर तुम्ही त्यांच्यासमवेत भगवान नारायण यांचे चित्र ठेवले तर देवी खूप प्रसन्न होते. यानंतर देवीला कुंकू, प्रसाद, वस्त्र, धूप-दिवा व पुष्प अर्पण करा. यानंतर माळेने जप करून, तुपाच्या दिव्याने देवीची आरती करावी.
तसेच या नियमांचे सुद्धा पालन केलेच पाहिजे.
जिथे स्त्रियांचा सन्मान होत नाही अशा घरात आई लक्ष्मी कधीही राहत नाही. नेहमीच स्त्रियांचा आदर करा. सतत त्यांचा अपमान करू नका.
ज्या घरात कलह आहेत किंवा अशांततेचे वातावरण आहे अशा घरात आई लक्ष्मीचे निवासस्थान नसते. म्हणून भांडणे टाळा. घरात शांतता ठेवा. जे लोक पूजा करूनही आपण आपले विचार चांगले ठेवत नाही, जर आपल्या मनात चुकीच्या गोष्टी चालू असतील तर आई लक्ष्मी आपल्या घरात कधीही राहणार नाही. म्हणून, कोणीही आपल्या मनात चुकीचे विचार येऊ देऊ नका आणि कोणाला फसवू नका.
देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते. म्हणून नेहमीच आपले घर स्वच्छ ठेवले पाहिजे आणि घरात घाण पसरवू नका. घर नीटनेटके ठेवा. संध्याकाळी झोपू नका. जर कोणी संध्याकाळी झोपला असेल तर अशा लोकांच्या घरात लक्ष्मीचा आशीर्वाद राहत नाही. म्हणून संध्याकाळची झोप टाळा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
Post a comment