आपली आर्थिक स्थिती सुधारावी व आपल्यावर महालक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून प्रत्येक व्यक्ती महालक्ष्मीची पूजा करत असतो. शुक्रवार हा दिवस महालक्ष्मीसाठी अर्पित केलेला आहे. शुक्रवार हा महालक्ष्मीचा वार असतो म्हणुनच शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करण्याचे विशेष महत्व मानले जाते.
आम्ही आज आपल्याला महालक्ष्मीमातेला प्रसन्न करण्याकरता काही मंत्र सांगत आहोत,चला तर जाणून घेऊया महालक्ष्मी मातेचे मंत्र:-
१.धन लाभाकरता मंत्र: ॐ धनाय नम:
२.घरात सौख्य लाभण्याकरता मंत्र: ओम लक्ष्मी नम:
३.हातातून गेलेल्या संधी परत मिळवण्याचा मंत्र : ॐ ह्रीं ह्रीं श्री लक्ष्मी वासुदेवाय नम
४.पत्नी सुखाकरता मंत्र: लक्ष्मी नारायण नम:
५.यशप्राप्तीसाठीचा मंत्र: ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम:
६. सर्वप्रकारच्या यशप्राप्तीसाठीचा मंत्र:
अयिकलि कल्मष नाशिनि कामिनि, वैदिक रूपिणि वेदमये क्षीर समुद्भव मङ्गल रूपिणि, मन्त्रनिवासिनि मन्त्रनुते । मङ्गलदायिनि अम्बुजवासिनि, देवगणाश्रित पादयुते जय जयहे मधुसूदन कामिनि, धान्यलक्ष्मि परिपालय माम् ॥
लक्ष्मी माता ही विष्णूची पत्नी आहे. जी कमळावर विराजमान आहे. लक्ष्मी मातेचे हे रूप अतिशय नयनरम्य आहे. लक्ष्मी माता धन, वैभव तसेच समृद्धी देणारी देवता आहे. लक्ष्मीचा अर्थ संपत्ती असा होतो. तसेच ज्या व्यक्तीवर माता महालक्ष्मीची कृपा असते त्या व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. माता महालक्ष्मीला भुदेवी आणि श्रीदेवीच्या अवतारात देखील मानले व पुजन केले जाते.
अशी करा देवी लक्ष्मीची पूजा-
माता लक्ष्मीची पूजन करण्याअगोदर संपूर्ण घर स्वच्छ साफ करून घ्यावे. त्यानंतर आपण आंघोळ करून चांगले स्वच्छ कपडे घालावे. माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी. पूजेच्या ठिकाणी अगोदर एक चौरंग मांडावा. या चौरंगावर पिवळा किंवा लाल कपडा ठेवावा.
यानंतर माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती या कपड्यावर ठेवावी. माता लक्ष्मीला सोळा शृंगार अर्पण करावे. तसेच आपल्या क्षमतेनुसार नैवद्यपाणी दाखवावा. माता लक्ष्मीच्या चरण कमलाजवळ कमळाचे पुष्प अर्पण करावे. माता लक्ष्मीला गणपती खूप प्रिय आहेत. त्यामुळे गणपतीचा आवडता प्रसाद असलेले लाडू देखील देवीला प्रसादामध्ये ठेवले तर महालक्ष्मी देवी सोबतच गणपती देखील आपल्यावर प्रसन्न होतील.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
Post a comment