संकष्टी चतुर्थी हा सण यंदा ३१ जानेवारी रोजी साजरा होणार आहे. मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला अंगारकी असे म्हटले जाते. अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते.

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मराठी महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात.

संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. हे व्रत कोणाही करू शकते.

गणपतीचे भक्त हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा करतात. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व विशेष आहे. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्वाचा भाग आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. बऱ्याच शहरांमध्ये हा वक्रतुंडी चतुर्थी अश्या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो.

तसेच आपल्या सर्वांना माहीतच असेल की या चतुर्थीला गणपतीची पूजा केली जाते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या जातात.

या दिवशी काय करावे-

लक्षात ठेवा, श्री गणेश चतुर्थीला लवकर उठून आंघोळ केल्यावर सूर्याला पाणी द्या. ओम सूर्याय नम: या मंत्राचा जप करावा. आपण घरातील श्री गणेश देवाच्या मूर्तीचे गंगेचे पाणी आणि मध वापरून स्नान घालू शकता. या दिवशी गणपती बाप्पाला कुंकू, दुर्वा, फुले, तांदूळ, फळे, प्रसाद इत्यादी अर्पण करु शकतात.

या दिवशी मंत्राचा जप करून पूजा करावी.

असे म्हणतात की या दिवशी आपण भगवान शिव, यांचा ' ओम सांब सदाशिवाय नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यासह शिवलिंगावर तांब्याच्या भांड्याने पाणी वाहावे. या दिवशी पूजेनंतर गरजू लोकांना घरातील पैसे व अन्नधान्य दान करावे व गायीच्या गोठ्यात सुद्धा दान करावे. भाकरी किंवा हिरवे गवत या दिवशी गायीस दिले जाऊ शकते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Post a Comment

Previous Post Next Post