जिऱ्याचा वापर प्रत्येक घरात किचन मध्ये केला जातो. भाजी बनवण्यासाठी तसेच भात बनवण्यासाठी जीरा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे भाजीला चव येते. तसेच जिरे हे खूपच औषधी देखील आहे. त्यामुळे अनेक फायदे देखील होत असतात जिऱ्यामध्ये अनेक औषधी गुण असतात.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला जिऱ्याविषयी सांगणार आहोत. परंतु आम्ही ज्या जिऱ्या विषयी सांगणार आहोत ते साधारण जिरे नसून काळे जीरे आहे जे स्वादाने थोडेसे वेगळे असतात. जर घरामध्ये वापरले जाणाऱ्या जिऱ्याएवजी हे काळे जिरे वापरले तर तीन चार महिन्यांमध्ये अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते.

काळ जिरे आपली अतिरिक्त चरबी कमी करून आपले तंदुरुस्त शरीर बनवत असते. ज्याच्या नियमित सेवनामुळे आपली प्रतिकारशक्ती देखील वाढत असते. जिऱ्याचे सेवन केल्यामुळे शरीरामध्ये ऊर्जेचा संचार होत असतो. यामुळे थकवा येणे आणि कमजोरी वाटणे सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.

काळ्या जिऱ्यामध्ये रोग विरोधक गुण असतात ज्या कारणामुळे जिरे हे पोटा संबंधित आजारांवर देखील खूपच फायदेमंद ठरू शकते. जसे की पचना संबंधीचे काही समस्या, गॅस्ट्रो, पोटात दुखणे, पोटात जंत होणे, पोटात गॅस समस्या इत्यादी प्रकारच्या अनेक समस्यांपासून काळे जिरे रे सुटका देत असते.

कधी कधी आपल्याला सर्दी होत असते. सर्दी ही बदलत्या वातावरणामुळे पाण्यामध्ये बदल झाल्यास किंवा धुळीमुळे देखील होत असते. सर्दीसाठी जिरे खूपच फायदेशीर असतात. यासाठी तुम्ही एका छोट्याशा रुमालात जिरे घ्यावे व त्याला गाठ मारून हे जिरे गरम करावे व याद्वारे श्वास घ्यावा. नाक जाम होणे सर्दी-पडसे या सर्वांपासून हा उपाय केल्यास नक्की आराम मिळतो.

Post a Comment

Previous Post Next Post