सूर्य एका राशीमध्ये जवळपास एक महिना राहत असतात. 12 फेब्रुवारी च्या दिवशी सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीमध्ये तो जवळपास एक महिना राहणार आहे. कुंभ राशीचा स्वामी हा ग्रह शनी आहे. सूर्याचे कुंभामध्ये असणे खूपच शुभ असल्याचे सांगितले जाते कुंभ स्वामी ग्रह शनी न्यायाचा कारक ग्रह आहे. आणि त्यात माघ हा पवित्र महिना आहे.

या दिवशी एखाद्या पवित्र नदी मध्ये अंघोळ करावी. दान पुण्य करावे तीळ व गुळाचे सेवन करावे. यामुळे आपले आरोग्य चांगले राहील. तसेच तीळ व गुळाचे दान करणे हे देखील खूपच भाग्याचे ठरेल.

सूर्याचा कुंभ राशी मध्ये असणे हे व्यवसायिक जीवनासाठी खूपच चांगले असल्याचे सांगितले जाते. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा खुपच चांगला संदेश असू शकतो. इतर अनेक राशींवर याचा फायदा होणार आहेत. सूर्य कुंभ राशी मध्ये असल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना आजच्या दिवशी शुभ संकेत मिळू शकतात.

कुंभ राशीचे जर कोणी विद्यार्थी असतील तर अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून काहीतरी नवनवीन बातम्या ऐकायला मिळतील. कुंभ राशीचे जे लोक व्यवसायिक क्षेत्रामध्ये काम करत असतील अशा लोकांना व्यवसायिक दृष्टिकोनातून खूप फायदा होणार आहे.

आजच्या दिवशी बऱ्याच दिवसानंतर या लोकांना धनप्राप्ती देखील होऊ शकते. गृहनिर्माण संबंधित कार्य आजपासून सुरू होऊ शकते. तसेच आजच्या दिवशी तुमचे आरोग्य देखील खूपच चांगले राहणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला हिरवा रंग शुभ असणार आहे. तुम्ही आज सूर्य देवाचा मंत्राचा जप देखील करू शकता.

सूर्य देवाचा जप केल्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच भाग्याचा दिवस असणार आहे.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Post a Comment

Previous Post Next Post