हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रीय बाबींमध्ये घरामध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्यात व कोणत्या ठेवू नये याबद्दल मार्गदर्शन केले जाते. असे म्हटले जाते की वास्तूदेवता जर आपल्यावर प्रसन्न असेल तर घरामध्ये सुख शांती व आनंद नांदतो. याबाबतीत घरात जर देवस्थान किंवा देवघराच्या वस्तूबद्दल काही गोष्टी चुकीच्या असतील तर त्या अशुभ मानल्या जातात.

आज आम्ही या लेखाद्वारे आपल्याला देवघरामध्ये कोणत्या वस्तू ठेवू नये याबद्दल माहिती घेणार आहोत.

१.वाळलेली फुले- कोणत्याही सण-समारंभामध्ये आपण देवपूजा करण्याकरता फुले वापरत असतो. मात्र वाळलेली फुले आपण वेळत काढून टाकत नाही. ही वाळलेली फुले अधिक काळ घरात ठेवल्याणे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. यासोबतच आर्थिक प्रश्न निर्माण होतात.

२.हे फोटो ठेवू नका देवघरात- देवघरामध्ये देवांच्या फोटोसोबत कधीही घरातील मृत व्यक्तींचे व पूर्वजांचे फोटो ठेवू नयेत. पूर्वजांचे फोटो दक्षिण दिशेला लावल्यामुळे पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो.

३.अशा मुर्त्या घरात ठेवू नका- दैवतांच्या मुर्त्या तुटलेल्या असतील किंवा भंगलेल्या असेल तर अशा मुर्त्या कधीही घरात ठेवू नये. मोठ्या आकाराच्या मुर्त्यादेखील घरात ठेवू नये. छोट्य‍ा आकाराची मूर्ती देवघरात ठेवावी. तसेच एका देवघरात दोन शंख ठेवू नयेत. देवघरामध्ये एकापेक्षा जास्त देवांच्या प्रतिमा नसाव्यात.

४. देवघरात हे सामान ठेवू नका- होम-हवण केल्यानंतर उरलेली सामग्री घरात ठेवू नये. उरलेली सामग्री वाहत्या पाण्यात वाहून द्यावी.

५.घरात शिवलिंग ठेवताना या नियमांचे पालन करा -

जर आपल्याला घरात शिवलिंग ठेवायचे असेल तर त्याचे नियम पाळावे लागतात. नियमित पुजा करावी लागते. तसेच मोठ्या आकाराचे शिवलिंगाला घरात ठेवू नये. अंगठ्याच्य‍ आकाराचे शिवलिंग वापरला पाहिजे.

६. स्वयंपाक घरात देवघर बनवू नये. अनेक लोक स्वयंपाक घरामध्ये छोट्याशा जागेमध्ये देवघर बनवतात. मात्र असे केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये वाढते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Post a Comment

Previous Post Next Post