प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये वेगळी स्वप्न पाहत असतो. कोणाला बंगला हवा असतो, तर कोणाला आलिशान मोटर कार हवी असते, तर काहींना हवे असते कायम देशविदेशाच्या यात्रा करणे व जगभर फिरून येणे व ऐशोआरामचे जीवन जगणे हे देखील काही लोकांचे स्वप्न असते.

बुद्धिमत्ता व मेहनत करण्याची तयारी असली तरी देखील कधी कधी आपले प्रयत्न कमी पडत असतात, कारण बुद्धिमत्ता व मेहनतीसोबत जर आपल्याला देवतांचा आशीर्वाद मिळाला तर आपले नशीब देखील आपली साथ देत असते.

आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे स्वप्नपूर्तीकरीता काही उपाय सांगणार आहोत, ज्याद्वारे आपल्याला आपले बंद झालेले नशीबाचे कवाडं देखील उघडणार आहे. चला तर पाहूया कोणते आहेत ते उपाय-

१.गाईला गुळ खाऊ घालणे- जर आपल्याला आपण पाहिलेली स्वप्ने साकार करायची असतील व आपल्या त्या मेहनतीचे फळ मिळण्यासाठी व आपले स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपण गुपचूप गाईला गुळ खाऊ घातला पाहिजे. यामुळे आपल्या ईच्छित मनोकामना लवकरच पूर्ण होतात.

२. अन्नदान करणे- शुक्रवारच्या दिवशी सलग अकरा शुक्रवार आपल्याला एका उपाशी व्यक्तीला जेवण द्यायचे आहे. त्यामुळे आपल्याला हवे ते सर्व साध्य होऊ शकेल व आपली स्वप्ने साकार होऊ शकतील.

३. शनी मंदिरात छाया दान करणे- शनिवारच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन आपण शनिदेवाला तेल वाहताना त्य‍मध्ये आपले प्रतिबिंब पाहावे व त्यानंतर तेल शनिदेवाला अर्पण करावे. यालाच छाया दान असे म्हणतात. हा उपाय केल्यामुळे आपली सर्व स्वप्न लवकरच पूर्ण होतात.

तर हे होते काही ज्योतिषशास्त्रीय उपाय! आपणही हे उपाय करून बघा व आपली मनोकामना व मनात असलेली आपली स्वप्ने लवकरच पूर्ण होतील अशी आम्ही आशा करतो.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Post a Comment

Previous Post Next Post